लातूर शहरात १८ वर्षांवरील वयोगटासाठी ८ केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:56+5:302021-07-23T04:13:56+5:30
लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय, बार्शी रोड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर), प्रा. ना. ...
लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय, बार्शी रोड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर), प्रा. ना. आरोग्य केंद्र, मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र. ०९), पं. जवाहरलाल नेहरू मनपा रुग्णालय, पटेल चौक (दुपारी १२ ते सायं.५), लातूर येथे १८ वर्षे व त्यापुढील वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे, तर कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस (कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस, तर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस २८ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) तसेच विवेकानंद प्रा. विद्यामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण), लेबर कॉलनी लातूर, यशवंत शाळा प्रा. ना. केंद्र, साळे गल्ली लातूर, प्रा. ना. आरोग्य केंद्र, राजीव नगर, विवेकानंद चौक लातूर व कै. बब्रुवान काळे, आयुर्वेद महाविद्यालय, भोई गल्ली, लातूर येथे १८ वर्षे व त्यापुढील वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. कोविशिल्ड लसीचे प्रमाण प्रत्येक केंद्रावर एकूण १५० पैकी ऑनलाईन ५० टक्के व ऑनस्पॉट ५० टक्के, तर कोव्हॅक्सिन लस १०० पैकी ऑनलाईन ५० टक्के व ऑनस्पॉट ५० टक्के. हे लसीकरण सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत राहील.
गर्दी वाढल्यास टोकन क्रमांक...
लातूर शहरातील ८ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. या ठिकाणी नागरिकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र सुरू होण्यापूर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील. लसीकरणासाठी येताना लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल फोन सोबत ठेवावे. ऑनलाईन बुकिंग सायंकाळी ७ वा. सुरू करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा उपायुक्तांनी केले आहे.