शिवाजी महाविद्यालयात लसीकरण जागृती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:25+5:302021-07-23T04:13:25+5:30
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते, तर प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. नसरीन मवनी ...
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते, तर प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. नसरीन मवनी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. मवनी म्हणाल्या, कोरोना हा आजार मानवासाठी अत्यंत घातक आहे. कोरोना विषाणू कान, नाक, तोंड व घशाच्या माध्यमातून फुप्फुसात प्रवेश करून शरीराची हानी करतो. प्रसंगी त्याचे शरीर विषाणूला बळी पडून रुग्णाचा मृत्यूही होतो. त्यामुळे अशा आजारापासून स्वतःला वाचविण्यासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच कोरोना झालेल्या व्यक्तींनी सर्दी, खोकला, तीव्र स्वरूपाचा ताप आदी लक्षणे दिसत असल्यास वेळेत उपचार घेणे व स्वतःचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो इतरांना होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना कॅन्सर, अस्थमा, बी. पी., शुगर व इतर मानवी आजार आहेत. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच स्वतःचे लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्रास होण्याची शक्यता असते, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा. नेहाल खान यांनी केले, तर डॉ. विष्णू पवार यांनी आभार मानले. प्रा. पी. डी. माने यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेस प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.