जिल्ह्यात १८ केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:05+5:302021-09-04T04:25:05+5:30
लातूर : जिल्ह्यात १८ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. ग्रामीण रुग्णालय देवणी, औसा, अहमदपूर, मुरुड, चाकूर, जळकोट, किल्लारी, बाभळगाव ग्रामीण ...
लातूर : जिल्ह्यात १८ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. ग्रामीण रुग्णालय देवणी, औसा, अहमदपूर, मुरुड, चाकूर, जळकोट, किल्लारी, बाभळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असून, पहिला डोस ज्यांचा झाला आहे, त्यांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. उदगीर, निलंगा उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणाची सोय असून, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीच्या उपलब्धतेनुसार व सूक्ष्म कृती आराखड्यानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाईल.
ऑनस्पॉट डोस सकाळी १० ते ५ यावेळेत सुरू राहणार आहे. १८ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस उपलब्धतेनुसार दिला जाईल. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. लसीकरणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल.