सुसंस्कृत समाजनिर्मितीत शिक्षकांचे मोलाचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:01+5:302021-09-04T04:25:01+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जळकोट तालुका शाखेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मन्मथप्पा किडे होते. यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धवराव भोसले, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश मरतोळे, शिवाजीराव साखरे वाघ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, किशनराव बिरादार, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव जाधव, चंदन पाटील, गजानन दळवे, सत्यवान पाटील दळवी, संगायोचे अध्यक्ष संग्राम पाटील, उपसरपंच बालाजी आगलावे, नगरसेवक स्वानंद देशमुख, महेश धुळशेट्टे, पंडित केंद्रे, प्राचार्य संपत शिंगाडे, आकाश वाघमारे, किशनराव सोनटक्के, दत्ता पवार, गोपाळकृष्ण गबाळे, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, ॲड. पद्माकर उगिले, महेश स्वामी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी विषय समजून घेऊन अभ्यास करावा. शिक्षणक्षेत्रात प्राथमिक शिक्षक सर्वात महत्त्वाचा घटक असून, तो पाया आहे. शिक्षण हे नोकरीसाठी नव्हे तर ज्ञानार्जनासाठी आहे. विद्यार्थ्यांत सामाजिक मूल्य रुजविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.
प्रास्ताविक शिक्षक समितीचे प्रकाश मरतुळे यांनी केले. बाला उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. तसेच दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार झाला.
सूत्रसंचालन प्रा. एम.जे. वाघमारे यांनी केले. आभार संतोष सोनवणे यांनी मानले.