साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:13+5:302021-09-02T04:43:13+5:30
लसाकम व लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका एस.एस. हणमंते होत्या. उद्घाटन लसाकमचे माजी ...
लसाकम व लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका एस.एस. हणमंते होत्या. उद्घाटन लसाकमचे माजी प्रदेशाध्यक्ष डाॅ. माधवराव गादेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड. आर.एस. वाघमारे, अण्णाराव सूर्यवंशी, डी.जी. वरवटे, लसाकमचे बालाजी साळुंके, उत्तमराव मिसाळ, उत्तमराव दोरवे, दयानंद कांबळे, अशोक तोगरे, ग्यानोबा घोसे, नरसिंग सांगवीकर, राजकुमार गोंटे, विश्वांभर जिवारे आदी उपस्थित होते. तालुक्यातील दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डाॅ. गादेकर म्हणाले की, चळवळीला सक्षम कार्यकर्त्यांची गरज असून, महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालविणे गरजेचे आहे. प्रास्ताविक लसाकमचे जिल्हा सचिव धनराज सूर्यवंशी, सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा सचिव संतराम मोठेराव यांनी केले. आभार मुख्याध्यापक राजकुमार सूर्यवंशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी लसाकमचे तालुकाध्यक्ष दीपक खलसे, उपाध्यक्ष अविनाश कसबे, सचिव मनोहर तोगरे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष रामजी मोठेराव, लहुजी जाधव, धोंडिराम कदम, नरहरी कांबळे, विजयानंद मोठेराव, अनिल डावरे आदींनी परिश्रम घेतले.