उदगिरातील रेल्वे रुळानजीकच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:21+5:302021-09-02T04:43:21+5:30

उदगीर : शहरातील समतानगर भागाच्या मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून किमान २० वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे सातत्याने ...

Vehicle owners harassed due to potholes near railway tracks in Udgira! | उदगिरातील रेल्वे रुळानजीकच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण !

उदगिरातील रेल्वे रुळानजीकच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण !

googlenewsNext

उदगीर : शहरातील समतानगर भागाच्या मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून किमान २० वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे सातत्याने वाहतूक ठप्प होते. दरम्यान, या रुळाच्या बाजूला गुडघाभर खड्डा पडला असून त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने अनेकदा अंदाज येत नाही. परिणामी, सतत किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

येथील रेल्वे स्थानकाच्या ३०० मीटरच्या अंतरावर समता नगर व उदगीर शहराला जोडणाऱ्या भागावर दक्षिण- मध्य रेल्वेचे फाटक आहे. या रुळावरून दिवसातून किमान २० वेळा रेल्वे व मालवाहतुकीच्या गाड्या धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे येण्याअगोदर किमान १५ मिनिटे फाटक बंद करण्यात येते. शहरातील समतानगर, संतोषीमातानगर, डॅम रोड, गोपाळनगर, क्रांतीनगर, नेत्रगाव, येणकी, मानकी, देवणी या भागांत जाणाऱ्या वाहनांना हा रेल्वे रूळ ओलांडून ये- जा करावी लागते.

समतानगर, गोपाळनगर, रेल्वे स्टेशनसमोरील भाग, संतोषीमातानगर, क्रांतीनगर आदी भागांत शहरातील किमान ३० टक्के वसाहत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी या भागातील नागरिकांनी प्रशासनाने भुयारी मार्गाचे खुला करून द्यावा, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा स्थानिक प्रशासन व दक्षिण-मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांच्यात बैठक होऊन रेल्वे गेटच्या पलीकडे असलेला भुयारी मार्ग स्थानिक प्रशासनाने खुला करण्याचे व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे आणि इतर मदत रेल्वे विभागाने पुरविण्याचे ठरले होते.

दररोज दुचाकीचे जवळपास २० अपघात...

रेल्वेच्या भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असतानाच या गेटवर रेल्वेच्या रुळाच्या बाजूला गुडघाभर खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दररोज किमान १५ ते २० दुचाकीस्वार पडतात. तसेच चारचाकी वाहनाचे टायर खड्ड्यात गेल्यामुळे रेल्वे गेटनजीक थांबलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावर घाण पाणी पडून संपूर्ण कपडे चिखलाने माखले जातात. रेल्वे रुळाचा व त्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी रेल्वे खात्याची असते; परंतु मागील दोन महिन्यांपासून पडलेल्या छोट्या खड्ड्यांचे रूपांतर आता गुडघाभर खड्ड्यात झाले. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Vehicle owners harassed due to potholes near railway tracks in Udgira!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.