Video: '56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं' अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 09:43 PM2019-04-15T21:43:46+5:302019-04-15T21:46:12+5:30

देश चालवायला 56 इंच छाती लागते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना रितेश देशमुख यांनी भाजपाला विशेषत: नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

Video: Actor Ritesh Deshmukh criticizes Narendra Modi | Video: '56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं' अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका 

Video: '56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं' अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका 

लातूर - देश चालवायला 56 इंच छाती लागते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना रितेश देशमुख यांनी भाजपाला विशेषत: नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. सध्या सोशल मिडीयावर अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये रितेश देशमुख म्हणतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात देश चालवायला ५६ इंचाची छाती लागते. मात्र ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते असं रितेश देशमुख यांनी सांगितले. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभेत रंगत आणली असताना अभिनेता रितेश देशमुखही आज लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित राहत प्रचारात सहभाग घेतला. 



 

या सभेत बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, तुमच्या खिशात असलेला मोबाईल काँग्रेसने दिला आहे, लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाले ही देखील काँग्रेसचीच देण आहे असंही रितेशने सांगितले. त्याचसोबत लोकं मला विचारतात की, यावेळी तुम्ही कोणाचा प्रचार करणार? या प्रश्नाला उत्तर देताना रितेश देशमुखने सांगितले की, आमच्या नसानसात काँग्रेस आहे, आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. आमचा जन्म काँग्रेसमध्ये झाला आहे. जिना यहॉ, मरना यहॉ इसके सिवा जाना कहा असं म्हणत रितेश देशमुखने उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. 

Web Title: Video: Actor Ritesh Deshmukh criticizes Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.