VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:08 IST2025-03-05T09:58:06+5:302025-03-05T10:08:37+5:30

लातूरमध्ये पुन्हा एकदा रस्ते अपघाताची घटना समोर आली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

VIDEO Another accident on Latur Chakur highway Biker injured | VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले

VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले

Latur Accident: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील लातूरजवळील नांदगावपाटी येथे पुन्हा एकदा अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली होती. या अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी दुचाकीस्वाला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता लातूर ते चाकूर महामार्गावर नांदगाव पाटी येथील रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

सोमवारी नांदगाव पाटीजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटली होती. या अपघातात  ४१ प्रवासी जखमी झाले. तर सात जण गंभीर असून, दोघांचे हात शरीरापासून वेगळे झाल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आलं आहे. जखमींवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. सोमवारी एसटीचा अपघात झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडताना एका कारचा अपघात झाला.

या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून यामध्ये अपघाताची भीषणता दिसत आहे. दुचाकीस्वार उजवीकडे वळण घेत असताना समोरुन येणाऱ्या कारने त्याला जोरदार धडक दिली. या अपघात दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडला. तर कार डिव्हायवर चढली. दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली होती.

दरम्यान, सोमवारी झालेल्या बस अपघातप्रकरणी दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरुन अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तुकाराम पल्ले हे गावाकडे परतत असताना नांदगावपाटी येथे वळण घेताना ते अचानक बससमोर आले. पल्ले यांना वाचवण्याचा प्रयत्नात बस उलटली. आष्टामोडजवळ असलेल्या टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला होता.

Web Title: VIDEO Another accident on Latur Chakur highway Biker injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.