Video - लातूरमध्ये दर गडगडल्याने तीन एकर कोथिंबिरीवर फिरविला नांगर

By हरी मोकाशे | Published: August 20, 2023 04:56 PM2023-08-20T16:56:21+5:302023-08-20T16:57:05+5:30

निलंगा तालुक्यातील राठोडा येथील शेतकरी बदलू शेख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीस चांगला भाव असल्याचे पाहून तीन एकरवर लागवड केली.

Video In Latur, three acres of coriander were plowed by every thunderstorm | Video - लातूरमध्ये दर गडगडल्याने तीन एकर कोथिंबिरीवर फिरविला नांगर

Video - लातूरमध्ये दर गडगडल्याने तीन एकर कोथिंबिरीवर फिरविला नांगर

googlenewsNext

लातूर : चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेने निलंगा तालुक्यातील राठोडा येथील एका शेतकऱ्याने तीन एकरवर कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र, सध्या बाजारात दर कोसळल्याने निराश झालेल्या या शेतकऱ्याने संपूर्ण कोथिंबिरीच्या पिकावर शनिवारी ट्रॅक्टर फिरविला आहे.

निलंगा तालुक्यातील राठोडा येथील शेतकरी बदलू शेख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीस चांगला भाव असल्याचे पाहून तीन एकरवर लागवड केली. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल आणि संसारास चांगला हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांचा ५५ हजार रुपयांचा खर्च झाला होता. दरम्यान, कोथिंबिर चांगली बहरली होती. त्यामुळे आनंद वाढला होता. कोथिंबीर काढणीस आली तेव्हा अचानकपणे बाजारात दर कोसळले. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडण्याची आशा मावळली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेख यांनी शनिवारी तीन एकरावरील कोथिंबिर पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिणामी, शेख यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जुलैमध्ये कॅरेटला ८०० रुपये भाव..

जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीच्या कॅरेटला ७०० ते ८०० रुपये भाव होता. त्यामुळे तीन एकरवर लागवड केली होती. त्यातून किमान तीन ते चार लाखापर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दर घसरल्याने आशेवर पाणी फिरले आहे. कोथिंबिरीमुळे खरीप हंगामही घेता आला नाही.
- बदलू शेख, शेतकरी.

आतापर्यंत ८१ हजारांचा खर्च...
जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीची लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत ८१ हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. मात्र, सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दर कोसळले आहेत. त्यामुळे व्यापारी खरेदीसाठी धजावत नसल्याने नांगर फिरविला आहे. कोथिंबिरीमुळे आर्थिक संकट ओढवले आहे, असे शेतकऱ्याने सांगितले.

प्रशासनाने मदत द्यावी...
गावातील शेख या शेतकऱ्याने कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र, दर कोसळल्याने संकट आले आहे. कोथिंबिरीमुळे खरीपातील सोयाबीनचे उत्पादनही घेता आले नाही. या शेतकऱ्यास जवळपास ८० हजारांचा फटका बसला आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन आर्थिक मदत द्यावी.
- ताजोद्दीन शेख, ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: Video In Latur, three acres of coriander were plowed by every thunderstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.