गावकऱ्यांनी मिळवून दिली शाळेला जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:37 AM2021-02-28T04:37:01+5:302021-02-28T04:37:01+5:30
मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक राजकीय मंडळींनी गावातील शाळा टिकून ती वाढली पाहिजे म्हणून जागेसाठी लोकवर्गणी करण्याचा ...
मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक राजकीय मंडळींनी गावातील शाळा टिकून ती वाढली पाहिजे म्हणून जागेसाठी लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला. घरोघरी जाऊन शाळेचे महत्व पटवून दिले. त्यामुळे अवघ्या महिनाभरातच चार लाखांचा लोकवाटा जमा झाला. त्या लोकवर्गणीतून चार गुंठे जागा शाळेसाठी घेण्यात आली.
रामराजे देशपांडेंनी दिली गुंठाभर जागा मोफत
गावातील सज्ञानाबरोबरच निरक्षरही लोकवाटा देत असल्याचे पाहून गावातील रामराजे देशपांडे यांनी शाळेसाठी एक गुंठा जागा मोफत दिली आहे. शाळेस एकूण पाच गुंठे मिळाली आहे. त्यामुळे आता तिथे इमारत उभारण्याबरोबर मुलांचे शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहावे म्हणून क्रीडांगण निर्माण करण्यात येत आहे. सदरील इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडून २९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
मजुरांनीही दिली वर्गणी
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे हाताला काम नव्हते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून उरलेल्या रकमेतून गावातील मजुरांनीही लोकवर्गणीसाठी मदत दिली. कोणीही लोकवर्गणी देण्यास विरोध दर्शविला नाही. उलट आनंदाने मदत केल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौदागर वगरे यांनी सांगितले.
लाख मोलाची मदत
गावातील प्रत्येकाचे शाळेवर प्रेम असल्याने प्रत्येकाने आर्थिक मदत दिली. शाळेत संगणकासह सौरऊर्जा प्लांट आहे. शिक्षकही तळमळीने अध्यापनाचे कार्य करतात. त्यामुळे पटसंख्या टिकून आहे, असे मुख्याध्यापक चंद्रकांत मोटे यांनी सांगितले.