शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 09:38 PM2018-10-26T21:38:55+5:302018-10-26T21:39:00+5:30

जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

Vitamin B 12 decreased among vegetarians | शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

Next

 - आशपाक पठाण

लातूर - जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे चिडचिडेपणा, अशक्तपणा व थकवा जाणवत असून यातून हातपाय दुखणे, नसांचे आजार उद्भवतात़ त्यामुळे रूग्णांणी यावर वेळीच काळजी घेऊन आपल्या आहारात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत, असा सल्ला डॉ. विश्रांत भारती यांनी दिला आहे.

अनेकजण सकाळी लवकर उठत नाहीत.  त्यामुळे सकाळचे कोवळ्या उन्हात फिरण्याचा फारसा संबंधही येत नाही. त्यातच पुन्हा खानपानातही काळजी घेतली जात नसल्याने विविध आजार बळावतात. शाकाहारी लोकांमध्ये सध्या व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामुळे चिडचिडेपणा येत असून थकवाही जाणवत आहे. यापासून बचाव करण्यासाठी शाकाहारी लोकांनी दुध व दुग्धजन्य पदार्थ जास्तीत जास्त खाणे आवश्यक आहे. याशिवाय, महिन्यातून किमान एकवेळा मांसाहार केल्यास  आपल्या शरिरात व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते़ अनेकदा आपण अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास दुर्लक्ष करतो. मात्र, असे न करता वेळीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे़ शरिरातील बी १२ कमी झाल्यास त्यातून उद्भवणारे आजार हे गंभीर स्वरूपाचेही असू शकतात़ सध्या धावपळीच्या युगात अनेकांना कामातून वेळ मिळत नाही, चिडचिडेपणा आल्यावर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे डॉ़ विश्रांत भारती म्हणाले.

कार्यालयात बसणा-यांना अधिक त्रास
  शासकीय, खाजगी कार्यालयात काम करणाºयांमध्येही काम करणा-या व्यक्ती, तसेच जास्तीत जास्त वेळ कार्यालयात बसणाºयांना व्हिटॅमीन डीचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळेच अनेकांना अचानकपणे विविध आजार जडत आहेत़ यापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. मानवी शरिरात व्हिटॅमीनचे योग्य प्रमाण आवश्यक असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ व्हिटॅमीन डी साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे गरजेचे आहे. शिवाय, कधीतरी मांसाहारही गरजेचा असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे
शरिरात व्हिटॅमीन बी १२ चे कमी झाल्यास सर्वात प्रथम अशक्तपणा, पायी चालताना लवकर थकवा जाणवतो किंवा चिडचिडेपणा निर्माण होतो. काही दिवसांनी नसांमध्ये कमजोरी, मेंदूवर परिणाम होण्याचा धोका असतो़ त्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.

Web Title: Vitamin B 12 decreased among vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.