‘सामान्य’ भासविणाऱ्यांना खुर्चीची प्रतीक्षा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:14+5:302021-09-04T04:24:14+5:30
गुणांसाठी शिक्षकांचा आटापिटा... ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ...
गुणांसाठी शिक्षकांचा आटापिटा...
५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. त्यासाठी निवड समिती असते. या पुरस्कारासाठी दरवर्षी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले जातात. शिक्षणासाठी नवोपक्रम, सामाजिक बांधिलकी असे विविध मुद्दे असतात. त्यासाठी ८० गुण तर २० गुण निवड समितीच्या हाती असतात. कोविडमुळे गेल्या वर्षी पुरस्कारासाठीची प्रक्रिया झाली नव्हती. सध्या जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक आकर्षक प्रस्ताव तयार करीत आहेत. मात्र, काही शिक्षक आपला प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर न करता थेट समितीच्या अध्यक्षांकडेच सादर करून आपले काम उत्कृष्ट आहे, हे सादरीकरण करीत आहेत. तेव्हा समिती पदाधिकारी आपले कार्य सर्वोत्कृष्ट आहे, पण अगोदर ८० गुणांपैकी चांगले गुण घ्या. तिथे चांगले गुण न मिळाले तर आमचे गुण निष्फळ ठरतील, असे स्पष्ट सांगून पाठवित आहेत.
विकेट पडू नये म्हणून दक्षता...
घरोघरी स्वच्छतागृह बांधावे आणि त्याचा नियमित वापर करावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांत मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे घरोघरी शौचालये बांधण्यात आली. मात्र, सध्या त्याचा कितपत वापर होतो, हे सर्वांनाच माहीत आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच ताण पडला आहे. नवीन अधिकारी नियुक्त होईपर्यंत त्यांना ‘किशोर’ म्हणून कार्य करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आपली विकेट जाऊ नये म्हणून तेही दक्षता घेत आहेत.