'वाँटेड' गुन्हेगाराला पकडण्यासाठी लग्नमंडपात आलेल्या पोलिसांवर वऱ्हाडींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 05:12 PM2019-06-20T17:12:41+5:302019-06-20T17:14:52+5:30

वाँटेड आरोपी भावाच्या लग्नात आल्याच्या माहितीवरून पोलीस लग्नात आले

wanted criminals relatives attack on policemen in latur | 'वाँटेड' गुन्हेगाराला पकडण्यासाठी लग्नमंडपात आलेल्या पोलिसांवर वऱ्हाडींचा हल्ला

'वाँटेड' गुन्हेगाराला पकडण्यासाठी लग्नमंडपात आलेल्या पोलिसांवर वऱ्हाडींचा हल्ला

Next
ठळक मुद्देमारहाण करणारे सहाजण ताब्यात जखमीवर शासकीय रूग्णालयात उपचार

लातूर : गेल्या काही दिवसांपासून वाँटेड असलेला आरोपी पकडण्यासाठी शहरातील बुऱ्हाण नगर भागात एका विवाह समारंभात गेलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना वऱ्हाडातील नागरिकांनी जबर मारहाण केल्याची घटना दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली़ याप्रकरणी सहा जणांना विवेकानंद चौक पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींची धरपकड सुरू केली आहे़ 

सूत्रांनी सांगितले, लातूर शहरातील बुऱ्हाण नगर भागात वाँटेड असलेल्या आरोपीच्या भावाचे लग्न होते़ याठिकाणी आरोपी येणार असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी लागली होती़ त्यामुळे स्थागुशाचे प्रकाश भोसले, युसूफ शेख, रामहरी भोसले व अन्य एक कर्मचारी लग्न समारंभात गेले होते़ विवाह लागल्यावर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता वऱ्हाडी मंडळीतील काहींनी पोलिसांना मारहाण सुरू केली़ जमावाकडून मारहाण सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी सुटका करून दिली़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह विवेकानंद चौक, गांधी चौक पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले़ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील ४ ते ५ जणांना ताब्यात घेतले असून लोकांचा शोध पोलीस घेत आहेत़

दोघांवर उपचाऱ सुरु 
मारहाण झालेले पोलीस कर्मचारी प्रकाश भोसले, युसूफ शेख या दोघांवर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़

पक्षीमित्र धावले मदतीला
विवाह समारंभस्थळी पोलिसांना मारहाण होत असल्याचे पाहून पक्षीमित्र महेबूबचाचा मदतीला धावले़ त्यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत पोलिसांना बाजूला आणले़ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना माहिती दिल्यावर तात्काळ पोलीसही घटनास्थळी पोहचले़

Web Title: wanted criminals relatives attack on policemen in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.