जलदाब चाचणीसाठी थांबली १५ हजार घरांची नळजोडणी!

By हरी मोकाशे | Published: September 25, 2023 05:32 PM2023-09-25T17:32:23+5:302023-09-25T17:32:38+5:30

जलजीवन मिशन : आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ६४३ घरांत जोडणी

Water connection of 15 thousand houses stopped for water pressure test! | जलदाब चाचणीसाठी थांबली १५ हजार घरांची नळजोडणी!

जलदाब चाचणीसाठी थांबली १५ हजार घरांची नळजोडणी!

googlenewsNext

लातूर : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ लाख ४३ हजार ६४३ घरांमध्ये नळजोडणी देण्यात आली आहे. आणखीन ३० हजार १९६ घरांना नळजोडणी देण्याचे काम शिल्लक आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलदाब चाचणी न झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजार कुटुंबांना अद्यापही नळजोडणी झाली नाही.

प्रत्येक गावातील सर्व कुटुंबांना घरपोच, पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एप्रिल २०२१ पासून नळजोडणी केली जात आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८८५ गावे आणि वाडी-तांडे आहेत. वीसपेक्षा अधिक कुटुंब संख्या असलेल्या प्रत्येक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्ह्यात ९३५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील बहुतांश ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत.

लातूर तालुक्यात सर्वाधिक नळजोडणी...
तालुका - नळजोडणी - टक्केवारी

अहमदपूर - ३७८९३ - ८६.८०
औसा - ५४५८३ - ९४.१३

चाकुर - ३०५३४ - ९४.३०
देवणी - १५७०३ - ८९.५१

जळकोट - १६२४४ - ९३.९८
लातूर - ५६८३१ - ८६.२५

निलंगा - ५३०३४ - ९३.९८
रेणापूर - २३३८४ - ९४.१२

शिरूर अनंत. - १४१३४ - ९८.३४
उदगीर - ४१३०३ - ९५.०७

एकूण - ३४३६४३ - ९१.९२

दोन विभागांकडे काम...

जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे, तर नळजोडणीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व लघू पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यामुळे या अभियानात दोन्ही विभागांचे कार्य महत्त्वाचे आहे. दरम्यान, जलदाब चाचणीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. ही चाचणी न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.

नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल...
जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ३ लाख ७३ हजार ८३९ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ६४३ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत उर्वरित कुटुंबांना नळजोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या जलदाब चाचणीमुळे १५ हजार नळजोडणी थांबली आहे. ती लवकर पूर्ण होईल.
- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व लघू पाटबंधारे

Web Title: Water connection of 15 thousand houses stopped for water pressure test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.