लातूरसह पन्नास गावांवर पाणीटंचाईचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:02 AM2018-09-17T01:02:35+5:302018-09-17T07:11:25+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे.
मांजरा प्रकल्प क्षेत्रात केवळ २७७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रकल्पात ३़४ टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा ८ ऐवजी १० दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त नव्हे, तर केवळ ३़५०४ दलघमीचा मृतसाठा आहे़ रेणा प्रकल्पात २़६३८ दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे १़०६० दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही ०़०५० दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बºयापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प ४१़७८ टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही ६०़४४ टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात ९५़१८ टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात ४५़५० टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण १४० आणि २ मोठ्या प्रकल्पांत १६़७९ टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच २४ लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे.