उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी मांजरा प्रकल्पातून पाच बॅरेजेसमध्ये सोडले पाणी
By हणमंत गायकवाड | Published: April 6, 2023 06:10 PM2023-04-06T18:10:51+5:302023-04-06T18:11:12+5:30
२० लाख ७३ हजार रुपयांची सिंचन पाणीपट्टी भरणा झाला आहे. त्यानंतरच पाणी सोडण्यात आले आहे.
लातूर : उन्हाळी हंगामाकरिता मांजरा नदीवरील बॅरेजेसमध्ये मागणीनुसार आवश्यक परिगणना करून आगाऊ स्वरूपात सिंचन पाणीपट्टी भरणा करून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये झाला होता. त्यानुसार मांजरा नदीवरील पाच बॅरेजेसची २० लाख ७३ हजारांची सिंचन पाणीपट्टी भरताच पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यात आले आहे. या पाच बॅरेजेसमध्ये आता ८.८५८ दलघमी पाणीसाठा झाला आहे.
मांजरा नदीवरील ल्हासरा, बोरगाव-अंजनपूर, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा-पोहरेगाव या पाच बॅरेजेससाठी पाणी सोडण्यात आले आहे. ल्हासरा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता १.१३६ दलघमी आहे. त्यासाठी १.३९४ दलघमी पाणी सोडले आहे. टाकळगाव १.४०८, वांजरखेडा ३.२२६, वांगदरी १.२९२, कारसा-पोहरेगाव १.५३८ असे एकूण ८.८५८ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. .१९५ रुपये प्रतिघनमीटर या प्रमाणे पाणी देण्यात आले आहे. त्यानुसार २० लाख ७३ हजार रुपयांची सिंचन पाणीपट्टी भरणा झाला आहे. त्यानंतरच पाणी सोडण्यात आले आहे.
धरणात उपलब्ध पाणीसाठा असा
मांजरा धरणात सद्य:स्थितीत एकूण पाणीसाठा १५२.०५६ दलघमी आहे. यातील ४७.१३० दलघमी मृत पाणीसाठा असून, १०४.९२६ जिवंत पाणीसाठा आहे. या जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ५९.२९ आहे. त्यातील ८.८५८ दलघमी पाणी बॅरेजेससाठी देण्यात आले आहे.
बॅरेजेसनिहाय पाणीपट्टी वसुली
ल्हासरा, पोहरेगाव-अंजनपूर, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा-पोहरेगाव या बॅरेजेसना पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे. बॅरेजेसनिहाय पाणीपट्टी वसुली करून अहवाल विभागीय कार्यालयास सादर करण्यात आला आहे. दरम्यान, बॅरेजेसमध्ये पाणी सोडताना व सोडण्यापूर्वी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. मागणी आल्यानंतर अन्य बॅरेजेससाठीही पाणी सोडले जाणार आहे. टाकळगाव-देवळा बॅरेजेससाठी १.९१, वांजरखेडा ३.६०, वांगदरी ०.८४० आणि कारसा पोहरेगावसाठी