पशुधनासाठी केली पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:37+5:302021-04-26T04:17:37+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये बाला उपक्रम राबविण्यात येत आहे. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते ...

Water supply for livestock | पशुधनासाठी केली पाण्याची सोय

पशुधनासाठी केली पाण्याची सोय

googlenewsNext

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये बाला उपक्रम राबविण्यात येत आहे. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आणि गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तांबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या उपक्रमांतर्गत पशुधनासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.

त्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती राधाताई बिराजदार, मलिंगराव गोपाळे व उपसरपंच बस्वराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेशराव बिराजदार, लक्ष्मण ब्रम्हावाले, अमृत तुमकुटे, महारुद्र पसरगे, नागेश बोकछडे, दाऊदसाब सय्यद, ठाकूर, अशोक मुळे, मुज्जम्मील मोमीन उपस्थित होते.

उन्हाची तीव्रता वाढल्याने प्राणी पाण्यासाठी भटकत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांच्या पुढाकारातून किशोर पोतदार, प्रकाश गस्तगार यांनी हा उपक्रम सुरू केला. त्यास ग्रामपंचायतीने पाणी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी लक्ष्मण ब्रम्हावाले, अमृत तुमकुटे, श्रीमंत संगनाळे, लक्ष्मण चापाले, नामदेव चोले आदी उपस्थित होते.

Web Title: Water supply for livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.