लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

By हणमंत गायकवाड | Published: July 31, 2023 04:44 PM2023-07-31T16:44:19+5:302023-07-31T16:45:28+5:30

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा

Water supply schedule in Latur city collapsed again | लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

googlenewsNext

लातूर : मांजरा प्रकल्पामध्ये पाणीसाठा मुबलक असताना या ना त्या कारणाने शहराचा पाणीपुरवठ्यात वारंवार अडथळा येण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरात किमान आठ-दहा वेळा तरी वेगवेगळ्या कारणांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्य आला होता. सध्या हरंगुळ रेल्वे स्टेशन परिसरात केबल वायरची समस्या निर्माण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. रिमझिम पावसामुळे दुरुस्तीलाही अडथळा आला असून पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा केल्याने शुद्धीकरण सुरू झाले आहे. मात्र या अडथळ्यामुळे शहरातील प्रत्येक भागाचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे गेला आहे.

हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरामध्ये केबल वायर सतत जळत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी वियची समस्या आहे. केबल वायर टाकले की ते जळत आहे. परिणामी,शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. दोन दिवस प्रयत्न करूनही दुरुस्ती झाली नाही. आता महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र ही व्यवस्था तात्पुरती आहे. मंगळवारी बिघाड झाला होता. दोन दिवस प्रयत्न केल्यानंतरही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे बुधवारी पर्यायी व्यवस्था करून गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र वेळापत्रक कोलमडले आहे. प्रत्येक भागात दोन दिवसाने रोटेशन पुढे गेले आहे, अशी माहिती शहराचे पाणी वितरणाचे विभाग प्रमुख जलील शेख यांनी दिली.

प्रत्येक जलकुंभावरील रोटेशन बदलले....
पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. या सर्व जलकुंभावरून पाणी सोडण्यासाठी वेळापत्रक आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी सोडायचे याबाबतचे नियोजन असते. मात्र केबल वायरची समस्या झाल्याने इकडे वेळापत्रक कोलमडलेले आहे. शहरातील नागरिक पाणी का आले नाही याबाबत एकमेकांना विचारणा करत आहेत.

दररोज मांजरा प्रकल्पातून उचलले जाते ५० एमएलडी पाणी...
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज पन्नास एमएलडी पाणी उचलले जाते. लातूर येथील हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण झाल्यानंतर जलकुंभ निहाय वितरण केले जाते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या भागात पाणी सोडण्याचा दिवस होता. त्या भागातील नागरिकांना पाणी सुटण्याची वाट पाहावी लागत आहे.

शहरातील नागरिकांची गैरसोय..
नळाला पाणी सुटण्याचा दिवस असल्यानंतर गृहणी, नागरिक भांडे धुवून, कोरडे करून वाट पाहत असतात. मात्र गुरूवारपासूनच नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शिवाय महानगरपालिकेकडून ही सूचना दिली नसल्यामुळे नळाला पाणी सुटण्याची वाट पाहू लागली.

Web Title: Water supply schedule in Latur city collapsed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.