'पंकजच्या टोळीतील आहोत, पैसे काढ'; लातुरात विद्यार्थ्यास चाकूच्या धाकावर लुबाडले !
By राजकुमार जोंधळे | Published: September 17, 2022 07:26 PM2022-09-17T19:26:15+5:302022-09-17T19:26:42+5:30
पैसे हिसकावल्या प्रकरणी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल
लातूर : सायंकाळी शिकवणीला दुचाकीवरुन निघालेल्या एका विद्यार्थ्याला उड्डापुलाखाली पाच ते सहा जणांनी अडवून चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील राेकड हिसकावली. ही घटना गुरुवारी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात शनिवारी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, गुरुवार, १५ सप्टेंबर राेजी सायंकाळी दाेन विदार्थी आपल्या दुचाकीवरुन खाजगी शिकवणीसाठी जात हाेते. त्यावेळी त्यांना पाच ते सहा मुलांच्या टाेळक्याने त्यांची दुचाकी उड्डाणपुलाच्या परिसरात वाटेतच अडवली. त्यातील एकाने थांब... मला ओहखत नाहीस का? मी गणेश आहे. आम्ही पंकजच्या टाेळीतील आहाेत म्हणून चाकूचा धाक दाखविला. दरम्यान, यावेळी दुचाकीवर असलेला चालकाचा मित्र घाबरुन पळून गेला. त्या टाेळक्याने त्या विद्यार्थ्याच्या पॅन्टच्या खिशातील ५४० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना काेणाला सांगितली तर पुन्हा उद्याेगभवन परिसरात फिरु देणार नाही, असे धमकावले.
याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन एकूण सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांकडून त्या टाेळक्यांचा शाेध घेतला जात आहे.