निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा दिखाऊपणा करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:09+5:302021-09-27T04:21:09+5:30

पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा व समर्पण सप्ताहांतर्गत आमदार अभिमन्यू पवार यांच्या विकासनिधीतून व ...

We should not pay attention to those who show off in the face of elections | निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा दिखाऊपणा करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये

निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा दिखाऊपणा करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये

Next

पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा व समर्पण सप्ताहांतर्गत आमदार अभिमन्यू पवार यांच्या विकासनिधीतून व क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून उपलब्ध सहा रुग्णवाहिकांच्या ऑनलाईन लोकार्पणप्रसंगी ते येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. अशोक कुकडे होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार पाशा पटेल, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्राचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सुशीलकुमार बाजपेयी, व्यंकट मोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. कुकडे म्हणाले, कुठलाही स्वार्थ न ठेवता सामाजिक सेवेसाठी राजकीय क्षेत्रात उतरले पाहिजे. त्यातूनच चांगले कार्यकर्ते तयार होतील. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या स्थानिक विकासनिधीतून तीन रुग्णवाहिका व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमास ॲड. मुक्तेश्वर वागदारे, ॲड. अरविंद कुलकर्णी, कंठीअप्पा मुळे, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, गटनेते सुनील उटगे, जिल्हा परिषदेचे सदस्य महेश पाटील, दीपक चाबूकस्वार, नगरसेवक गोपाळ धानुरे, समीर डेंग, हिमायत पटेल, फाऊंडेशनचे श्रीराम पाटील, सुहास पाचपुते, संजय कुलकर्णी, प्रा. शिव मुरगे, रमेश वळके, बंकट पाटील, दत्ता पाटील, बाबासाहेब पाटील, भागवत कांबळे, सुकेशना जाधव, श्रीधर जाधव, डॉ. आर. आर. शेख, संजय भालकीकर, आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, दोन वर्षांपूर्वी औशातील महाजनादेश यात्रेत औसा शहरासाठीच्या माकणी धरणातून वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात येईल, असा शब्द दिला होता. त्यानुसार चार दिवसांत ४५ कोटींचा निधी मंजूर केला. ही योजना आता पूर्णत्वास आली असून, लवकरच तिचा औसा शहराला लाभ होणार आहे. त्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला.

Web Title: We should not pay attention to those who show off in the face of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.