उदयगिरी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्रावर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:00+5:302021-09-27T04:21:00+5:30

अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबाेळी होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा.डॉ. ए.एम. देशमुख उपस्थित ...

Webinar on Microbiology at Udayagiri College | उदयगिरी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्रावर वेबिनार

उदयगिरी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्रावर वेबिनार

googlenewsNext

अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबाेळी होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा.डॉ. ए.एम. देशमुख उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, बी.एस्सी व एम. एस्सीनंतर विविध कोर्स उपलब्ध आहेत. सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामध्ये फूड टेक्नॉलॉजी, अल्कोहोल टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ड्रग डिझाईन, बायो इंजिनीअरिंग, वॅक्सिन इंडस्ट्री, संशोधन आदी क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व जिद्दीने अभ्यास केल्यास निश्चित यश मिळू शकते.

वेबिनारमध्ये १०४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. या वेळी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. बेल्लाळे, डॉ. राहुल मोरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. बाळकृष्ण संदीकर, सूत्रसंचालन प्रा. अश्विनी भाताडे यांनी केले. आभार डॉ. राहुल आलापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एस.व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार, अश्विन वळवी यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Webinar on Microbiology at Udayagiri College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.