नातेवाइकाच्या अंत्यविधीला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

By हरी मोकाशे | Published: September 1, 2023 08:15 PM2023-09-01T20:15:51+5:302023-09-01T20:16:04+5:30

सोने-चांदीच्या दागिन्यांसह साडेसहा लाख लंपास

Went to a relative's funeral and theft at home | नातेवाइकाच्या अंत्यविधीला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

नातेवाइकाच्या अंत्यविधीला गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

googlenewsNext

उदगीर : नातेवाइकाच्या अंत्यविधीस कुटुंबातील सर्व जण गेले होते. त्यामुळे घरी कोणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत कपाटातील सोने- चांदीचे दागिने, किमती साड्या, कपडे, असा एकूण ६ लाख ४१ हजार ७०० रुपयांचा ऐवज पळविला. ही घटना गुरुवारी शहरातील बीदर गेटजवळील दत्तनगर भागात घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बीदर गेटजवळील दत्तनगर भागात अभय बाबूराव जाधव यांचे घर आहे. ते आपल्या कुटुंबीयांसह गुरुवारी सकाळी नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी परतले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोने- चांदीचे दागिने व किमती कपडे, असा एकूण ६ लाख ४१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अभय जाधव यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत आहेत.

Web Title: Went to a relative's funeral and theft at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.