सोयाबीनला ७ हजारांवर भाव असताना महाबीजकडून केवळ ५ हजारांवर बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:13+5:302021-04-26T04:17:13+5:30
महाबीजने सोयाबीन जमा करून घेत असताना कोणतेही दर ठरवलेले नाहीत. चालू बाजार भावाप्रमाणे प्रतिक्विंटल ७० टक्के रक्कम दिली. त्यानंतर ...
महाबीजने सोयाबीन जमा करून घेत असताना कोणतेही दर ठरवलेले नाहीत. चालू बाजार भावाप्रमाणे प्रतिक्विंटल ७० टक्के रक्कम दिली. त्यानंतर अंतिम दर कळवला नाही आमच्या सोयाबीनचे वजन, चाळणी आमच्या परस्पर करून घेतली. त्यावेळी अंतिम दरही आपण सांगितला नाही. सोयाबीनमध्ये निघालेली गळ घेऊन जाण्याबद्दल आपण निरोप पाठवला. तर ती गळ जवळपास ७६ क्विंटल मागे साडेसतरा क्विंटल बाजूला काढण्यात आली. बाजारामध्ये आल्यानंतर त्याला रुपये ७९०० प्रमाणे दर मिळाला. तर नंबर एकचे सोयाबीन चाळणी करून काढून घेतले व त्याला दर मात्र ५ हजार १५८ रुपये देत आहात. आम्हाला हे कदापिही मान्य नाही. एक तर बाजारभावाप्रमाणे आमच्या सोयाबीनला दर द्या आणि ते जर शक्य नसेल तर आमचे दिलेले सोयाबीन आम्हाला परत द्या. शेतकऱ्यांची एका क्विंटल मागे आज घडीला तीन हजार रुपयाची होत असलेली लूट थांबेल. आपल्या कार्यालयाला याअगोदर पंधरा दिवसापूर्वी ही निवेदन दिलेले आहे. तरीपण त्याचीही दखल अद्याप घेतली नाही. आणि आपल्या कार्यालयाने आम्हाला याबाबत काहीही निरोप दिलेला नाही. आपण जर का आमचे सोयाबीन परत देण्यास टाळाटाळ केली तर आंदोलन करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी निवेदनात नमूद केले आहे.
क्विंटलला ३ हजाराचे नुकसान...
महाबीजचा दर बाजारापेक्षा जवळपास तीन हजार रुपयांनी कमी आहे. चाळणी करण्यापूर्वी दर जाहीर केला नाही, आता ५ हजार १५८ रुपये दर दिला जात आहे. बाजार भावाप्रमाणे दर देणार नसाल तर आमचे सोयाबीन परत द्या, अशी मागणी महाबीजकडे केली असल्याचे सत्तार पटेल यांनी सांगितले.