बाइकस्वारांची ‘धूम;’ या स्टंटबाजांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:28+5:302021-08-02T04:08:28+5:30

शहरात वेगवेगळ्या मार्गांवर स्टंटबाजी लातूर शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर स्टंटबाजी होत असल्याचे समोर आले आहे. कर्णकर्कश हॉर्नचा वापर करीत ही ...

Who will cover the bikers' 'Dhoom;' stuntmen? | बाइकस्वारांची ‘धूम;’ या स्टंटबाजांना आवरणार कोण?

बाइकस्वारांची ‘धूम;’ या स्टंटबाजांना आवरणार कोण?

Next

शहरात वेगवेगळ्या मार्गांवर स्टंटबाजी

लातूर शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर स्टंटबाजी होत असल्याचे समोर आले आहे.

कर्णकर्कश हॉर्नचा वापर करीत ही स्टंटबाजी केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अचानकपणे सुसाटपणे धावणाऱ्या स्टंटबाजांमुळे वाहनधारक काहीवेळ गोंधळून जातात.

तर जिवावर बेतू शकते

लातूरसह उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि औसा शहरातील मार्गावर स्टंटबाजी करणे काही तरुणांना अंगलट आले आहे. या स्टंटबाजीमुळे काही तरुणांना आपला जीव गमवावा लागला; तर काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागले. स्टंटबाजी करणे हे जिवावर बेतू शकते, याची कल्पना नसलेल्या तरुणांचा यामध्ये बळी गेला आहे.

दंड भरायचा अन्‌ सुटका करून घ्यायची !

लातूर शहर आणि जिल्ह्यात भरधाव आणि बेशिस्त वाहनधारकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. शिवाय, स्टंटबाजी करणाऱ्या, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई म्हणून वाहनेही जप्त केली जातात. ठोठावलेला दंड भरल्यानंतर ही वाहने सोडून दिली जातात. यातून वाहनधारकांना कायमचा धडा मिळत नाही.

७५९१५ जणांवर खटले दाखल

लातूर शहर आणि जिल्ह्यातील ७५९१५ बेशिस्त वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २,१८,७०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय, भरधाव असलेल्या ८२४४ वाहनधारकांवर स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले आहेत.

- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक

Web Title: Who will cover the bikers' 'Dhoom;' stuntmen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.