'तू आमच्या विरोधात का बोलतोस', जुन्या भांडणातून तरुणावर राॅड, काठीने हल्ला
By राजकुमार जोंधळे | Published: September 7, 2022 12:55 PM2022-09-07T12:55:10+5:302022-09-07T12:55:38+5:30
उदगीर ग्रामीण ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लातूर : जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर राॅड आणि काठीने हल्ला केल्याची घटना शेल्हाळ येथील घरासमाेर घडली. या हल्ल्यात २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात एकूण सात जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रवीण उर्फ शेखर लिंबाजी कांबळे (वय २२, रा.शेल्हाळ ता.उदगीर) याच्या घरासमाेर शेखर विजयकुमार कांबळे याच्यासह अन्य सहा जणांनी संगनमत करून, जुन्या भांडणाची कुरापत काढून लाेखंडी राॅड, काठीने जबर मारहाण केली, शिवाय तू आमच्या विराेधात नेहमीच का बाेलताेस, असे म्हणून फिर्यादीच्या भावाचा गळा दाबून लाेखंडी राॅडने मानेवर मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्याचबराेबर, फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना उदगीर तालुक्यातील शेल्हाळ येथे घडली. जखमीवर उदगीर येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शेखर विजयकुमार कांबळे यांच्यासह अन्य सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उदगीर येथील उपविभागीय पाेलीस अधिकारी डॅनियल बेन करत आहेत.