किराणा दुकान टाकण्यासाठी पत्नीचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:58+5:302021-07-23T04:13:58+5:30
पोलिसांनी सांगितले, पीडित पूजा धोंडिराम बिबराळे (वय १९) हिचा धोंडिराम बापूराव बिबराळे (रा. साकोळ) याच्यासोबत दोन ...
पोलिसांनी सांगितले, पीडित पूजा धोंडिराम बिबराळे (वय १९) हिचा धोंडिराम बापूराव बिबराळे (रा. साकोळ) याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी रीतिरिवाजप्रमाणे विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी पाच लाख रुपये हुंडा, चार तोळे सोने व इतर लागणाऱ्या वस्तू देऊन बनशेळकी येथे विवाह झाला होता. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती धोंडिराम बापूराव बिबराळे, सासू शांताबाई बाबूराव बिबराळे व सासरा बापूराव वैजनाथ बिबराळे (रा. सर्व साकोळ) यांनी घरातील लहान-मोठ्या कारणावरून भांडण करून अपमान करून शिवीगाळ करू लागले व आम्हाला साकोळ येथे किराणा दुकान घालायचे आहे म्हणून तू तुझ्या वडिलाकडून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ सुरू केली. तसेच उपाशी ठेवणे, मारहाण करून मानसिक छळ सुरू केला. बुधवारी पहाटे एक वाजता बनशेळकी, ता. उदगीर येथे माहेरला मला व माझ्या वडिलांना मारहाण करून एक वर्षाच्या मुलीला हिसकावून घेऊन गेले. जोपर्यंत तुझे वडील दुकान टाकण्यासाठी पाच लाख रुपये देणार नाहीत तोपर्यंत माझ्या घरी यायचे नाही, असे म्हणून सासरच्या मंडळींनी जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पूजा धोंडिराम बिबराळे यांनी दिली. या तक्रारीवरून पती धोंडिराम बापूराव बिबराळे, सासू शांताबाई बापूराव बिबराळे, बापूराव वैजनाथ बिबराळे यांच्याविरुद्ध उदगीरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एक वर्षाच्या मुलीला हिसकावून नेले...
पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, सासरच्या मंडळींनी मला व माझ्या वडिलांना मारहाण करून एक वर्षाच्या मुलीला माझ्याकडून हिसकावून घेण्यात आले. जोपर्यंत पैसे येणार नाहीत, तोपर्यंत यायचे नाही, असा दबावही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.