घंटागाडी मागे एका विजेत्यास मिळणार चांदीचे नाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:23 AM2021-02-25T04:23:54+5:302021-02-25T04:23:54+5:30

या उपक्रम अंतर्गत सलग तीन दिवस कचऱ्याचे वर्गीकरण करून देणाऱ्या नागरीकांना कुपन देऊन लकी ड्रॉच्या माध्यमातून चांदीचे ...

A winner will get a silver coin behind the bell! | घंटागाडी मागे एका विजेत्यास मिळणार चांदीचे नाणे !

घंटागाडी मागे एका विजेत्यास मिळणार चांदीचे नाणे !

Next

या उपक्रम अंतर्गत सलग तीन दिवस कचऱ्याचे वर्गीकरण करून देणाऱ्या नागरीकांना कुपन देऊन लकी ड्रॉच्या माध्यमातून चांदीचे नाणे जिंकता येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानात महानगरपालिकेने सहभाग घेतलेला आहे. या दोन्ही अभियानाला गती देऊन शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी व प्रशासन मेहनत घेत आहे. शहरात दररोज कचरा संकलन केले जाते. त्यावर प्रक्रिया केली जाते. हे सर्व सुरू असले तरी कचरा वर्गीकरण हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.

२६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या स्पर्धेअंतर्गत नागरिकांनी कचऱ्याचे ओला,सुका व घातक असे वर्गीकरण करून घंटागाडीला द्यावयाचे आहे. दररोज वर्गीकरण करून कचरा दिल्यानंतर घंटागाडी चालकाकडून संबंधित नागरीकाला कुपन दिले जाणार आहे. जे नागरिक किमान तीन दिवस कचरा वर्गीकरण करून देतील आणि तीन कुपन जमा करतील, अशा सर्व नागरीकांच्या कुपनचे एकत्रीकरण करून त्याचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. प्रत्येक घंटागाडी करिता नेमून देण्यात आलेल्या ७०० घरांकरिता स्वतंत्रपणे ही योजना राबविण्यात येत आहे. एक चांदीचे कॉईन या लकी ड्रॉ मधून दिले जाणार आहे. शहरात एकूण १२० घंटागाड्या चालवल्या जातात. त्यामुळे अशी १२० चांदीची नाणी नागरिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत.अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ....

शहरातील नागरिकांनी या अनोख्या स्पर्धेत सहभागी होऊन लातूर शहराला स्वच्छ व सुंदर करण्यात आपलेही योगदान द्यावे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानात लातूर शहराला राज्यात प्रथम क्रमांकावर आणावे,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

--

Web Title: A winner will get a silver coin behind the bell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.