शेतीत काम करणाऱ्या महिला करिअर वुमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:53+5:302021-02-05T06:22:53+5:30

जलजीवन मिशनबाबत जनजागृती व उमेद अभियानाअंतर्गत आर्थिक साक्षरता, बँक कर्ज वितरणासाठी येथील कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित महिला मेळाव्यात ...

Women Career Women working in agriculture | शेतीत काम करणाऱ्या महिला करिअर वुमन

शेतीत काम करणाऱ्या महिला करिअर वुमन

Next

जलजीवन मिशनबाबत जनजागृती व उमेद अभियानाअंतर्गत आर्थिक साक्षरता, बँक कर्ज वितरणासाठी येथील कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलजीवन मिशन अभियानच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बसवराज पाटील नागराळकर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, गटविकास अधिकारी महेश सुळे आदी उपस्थित हाेते.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार असून, यातून प्रत्येक व्यक्तिला प्रतिदिन ५५ लीटर पाणी पुरवठा केला जाणार आहे.

शुध्द पाणी, स्वच्छता महत्त्वाची...

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आवश्यक गरजा म्हणून गणल्या जातात. पण यापुढे शुध्द पाणी आणि स्वच्छता या दोन घटकांची जोड देणे आवश्यक आहे. या मिशनअंतर्गत ते ग्रामीण भागात पाणी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सामाजिकरण होत असून, शासनामार्फत बचत गट चळवळीस गती दिली जाईल.

Web Title: Women Career Women working in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.