बीओटी तत्त्वामुळे काम थांबले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:01+5:302021-07-05T04:14:01+5:30
उदगीर : जुने बसस्थानक पाडून तिथे नवीन अत्याधुनिक इमारत उभी राहणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ...
उदगीर : जुने बसस्थानक पाडून तिथे नवीन अत्याधुनिक इमारत उभी राहणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शेडही उभारण्यात आली आहे. मात्र, येथील बसस्थानक हे बीओटी तत्वावर करावयाचे असल्याने काम थांबले आहे. त्याचे पुढे काय झाले, याची आम्हाला अद्याप माहिती मिळालेली नाही, असे स्थानकप्रमुख वाय. एन. कानतोडे यांनी सांगितले.
बांधकामासाठीचा प्रस्ताव सादर...
५० वर्षांपूर्वीची बसस्थानकाची इमारत मोडकळीस आल्याने दोन - अडीच वर्षांपूर्वी नवीन व अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त इमारत बांधण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आला होता. त्यानंतर पाडकाम करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने पर्यायी बसस्थानकासाठी शेडही उभारली. मात्र, आम्हाला मध्यवर्ती कार्यालयाकडून बीओटी तत्त्वावर या बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना आल्याने आम्ही तसा प्रस्ताव तयार करून पाठवला आहे, असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.