पाडकाम करताना भिंत काेसळून मजूर ठार; लातुरातील क्रीडा संकुलावरची घटना
By राजकुमार जोंधळे | Published: August 20, 2023 08:56 PM2023-08-20T20:56:40+5:302023-08-20T20:56:48+5:30
घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
लातूर : इमारतीचे पाडकाम करताना अचानक भिंत काेसळून एक मजूर ठार झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद केली आहे. सुभाष त्र्यंबकेश्वर शिंदे असे मृत मजुराचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात बॅडमिंटन मैदानानजीक एका हाॅलमधील भिंतीचे रविवारी पाडकाम सुरू हाेते. दरम्यान, अचानकपणे भिंत अंगावर काेसळल्याने यात मजूर सुभाष त्र्यंबकेश्वर शिंदे (वय ४०, रा. सम्राट चाैक, लातूर) हे गंभीर जमखी झाले. यावेळी काही तरुणांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाेक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात शिवाजी गणेश गाेरे (वय ३८, रा. सम्राट चाैक, लातूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार नाेंद करण्यात आली आहे.