औश्याच्या आझाद महाविद्यालयात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:57+5:302021-01-23T04:19:57+5:30
औसा : येथील आझाद महाविद्यालय, निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालय व चापोलीचे संजीवनी महाविद्यालय यांच्या संयुक्त एक्यूएआरवर ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा ...
औसा : येथील आझाद महाविद्यालय, निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालय व चापोलीचे संजीवनी महाविद्यालय यांच्या संयुक्त एक्यूएआरवर ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. विजय जोशी, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य डॉ. पी. आर. थोरात, डॉ. अफसर शेख, डॉ. एस. डी. पवार, डॉ. ए. ए. यादव, डॉ. धनाजी आर्य यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ई. यू. मासुमदार, सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एस. कोरडे यांनी केले. प्रा. डॉ. एन. के. सय्यद यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य टी. ए. जहागीरदार, प्रा. डॉ. एन. के. सय्यद, प्रा. डॉ. एम. एम. बरोटे, प्रा. ओवेज झरगर यांनी परिश्रम घेतले.