लातूर प्रशासन, आयएमएच्या वतीने कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:05+5:302021-08-13T04:24:05+5:30
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत ...
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. सतीश हरदास यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या आयोजनाबाबत आयएमएच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांनी माहिती दिली. कार्यशाळेत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी बाधक ठरू शकते. त्यामुळे या लाटेचा सामना कसा करावा, रुग्णांना तत्काळ उपचार कसे मिळतील याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवप्रसाद मुंदडा यांनी मुलांमधील लक्षणे, प्राथमिक उपचार कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. डाॅ. संदीपान साबदे यांनी मुलांची काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली. आयएमएचे सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांनी आभार मानले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील डॉक्टरांची उपस्थिती होती.