खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून केले पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:11+5:302021-09-03T04:21:11+5:30
शहरातील नांदेड- बिदर मार्गावरील नांदेड नाका ते पेट्रोलपंपासमोर खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यांत पाणी साचत आहे. ...
शहरातील नांदेड- बिदर मार्गावरील नांदेड नाका ते पेट्रोलपंपासमोर खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यांत पाणी साचत आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे आल्यामुळे अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वेगात येणारे मोटारसायकलस्वार त्यात पडून जखमी होत आहेत. दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुरुवारी या खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून फुले वाहून नारळ फोडत मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मनसेच्या उदगीर शहर शाखेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी, शहर सचिव अमोल गाजरे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, लखन पुरी, श्रीकांत बिरादार, पवन राठोड, रजत शेटकर, सचिन नागपुर्णे, कृष्णा भताने, अशोक कराड, दया डोंगरे, जरगर उबेद, विजय रेड्डी, नामदेव राठोड आदींची उपस्थिती होती.