भारीच! लातूरात पोलिसांची शस्त्रे, विविध विभागांची माहिती घेण्यात विद्यार्थी हरखून गेले

By हणमंत गायकवाड | Published: January 4, 2024 06:01 PM2024-01-04T18:01:33+5:302024-01-04T18:04:42+5:30

लातूर जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना ओळख; शस्त्रास्त्रेही पाहिली

wow ! In Latur, the students curios in getting information about police weapons, various departments | भारीच! लातूरात पोलिसांची शस्त्रे, विविध विभागांची माहिती घेण्यात विद्यार्थी हरखून गेले

भारीच! लातूरात पोलिसांची शस्त्रे, विविध विभागांची माहिती घेण्यात विद्यार्थी हरखून गेले

लातूर : पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त लातूरच्या क्रीडा संकुलात पोलिस दलाच्या वतीने भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये जिल्हा पोलिस दलातील वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहलीच्या रूपाने क्रीडा संकुलात प्रदर्शन पाहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिस दलाच्या कामकाजाची ओळख होत आहे.

सायबर सेल, गुप्त विभाग, भरोसा सेल, मानव तस्करी विरोधी पथक, बॉम्बशोधक पथक, शास्त्र विभाग, क्राईम ब्रँच, इन्वेस्टिगेशन व्हॅन, डॉग स्कॉड, वाहतूक सुरक्षा, वायरलेस यंत्रणा, सुरक्षा हेल्पलाइन अशा विविध विभागाच्या माहितीचे आणि शस्त्राचे प्रदर्शन पोलिस स्थापना दिनाच्या (रेझिंग डे) निमित्ताने भरविण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय डोंगरे यांनी गुरुवारी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस दलाच्या वेगवेगळ्या विभागाची माहिती त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना दिली. अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रदर्शन पाहण्यासंदर्भात आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांनी अन् नागरिकांनी पोलिस दलाचे कामकाज जाणून घ्यावे 
जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पुढील आठवडाभर पोलिस दलाचे प्रदर्शन सुरू राहणार आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शन पाहून पोलिस दलाच्या कामकाजाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला....
लातूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पोलिस दलाचे प्रदर्शन दाखविले जात आहे. गुरुवारपासून प्रदर्शन पाहण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुतांश सर्वच शाळांचे विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. जणू विद्यार्थ्यांच्या सहलीचं प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांकडून आयोजित केल्या जात आहेत, असे चित्र क्रीडा संकुलात पाहायला मिळत आहे.

Web Title: wow ! In Latur, the students curios in getting information about police weapons, various departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.