मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने सरसकट नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:52+5:302021-09-02T04:43:52+5:30

महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, नगरसेवक रवि शंकर जाधव, अहमद खान पठाण यांच्या ...

Wrong notice to property owners | मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने सरसकट नोटिसा

मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने सरसकट नोटिसा

Next

महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, नगरसेवक रवि शंकर जाधव, अहमद खान पठाण यांच्या उपस्थितीत नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरातील अनेक मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने सरसकट नोटिसा देण्यात आले आहेत. याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आले आहेत. बांधकामे नियमित करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. ३० ते ४० वर्षे पूर्वीच्या बांधकामांना नोटिसा गेल्याने महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मालमत्ताधारकांना नोटीस देण्यापूर्वी नगरपालिकेत संबंधितांचा असणारा बांधकाम परवाना पडताळून पाहावा. त्यानंतरच नोटिसा पाठविण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. रुग्णालयांचे नर्सिंग परवाने प्रस्ताव प्रलंबित आहेत, अडून राहिलेले हे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, असेही या बैठकीत सूचित करण्यात आले. कुठल्याही पद्धतीची कारवाई करत असताना सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जावी. चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, यासाठी नियमांचे पालन करावे अशी सूचना करण्यात आली असून, मालमत्ता कराच्या नोटिसा आणि बांधकाम नियमितीकरण्याच्या नोटिसा चुकीच्या आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

बांधकामांना सरसकट नोटिसा देणे योग्य नाही. अनधिकृत बांधकाम झाले असल्यास त्यांचा बांधकाम परवाना पडताळून केवळ जास्तीच्या अथवा अवैद्य बांधकामाबाबत नोटीस द्यावी. याबाबत कोणाचाही अक्षेप राहणार नाही. रुग्णालयांच्या बाबतीत असेच सरसकट कारवाई केली गेल्याचे दिसून येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणांची परिपूर्ण तपासणी करून त्यानंतरच पारदर्शकपणे कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. बैठकीला बटन किल्ला मनपा उपायुक्त मयूरा शिंदेकर, विजय चव्हाण, समाधान सूर्यवंशी, पांडुरंग किसवे, कलीम शेख, संजय कुलकर्णी आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Wrong notice to property owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.