तंबाखूमुक्त शाळा अभियानात यशवंत विद्यालय अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:27+5:302021-02-05T06:21:27+5:30
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले नवीन ९ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य ...
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले नवीन ९ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या सुधारित ९ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे. या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक बालाजी बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक महादेव खळुरे यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभियान यशस्वीपणे शाळेत राबविले आहे. संस्थेत मागील वर्षभरात एक तंबाखूमुक्त नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवणे, रांगोळी स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी, एक पत्र व्यसनमुक्तीसाठी, तंबाखूजन्य पदार्थांची होळी, एक पणती व्यसनमुक्तीसाठी, आपट्याच्या पानावरून तंबाखूचे दुष्परिणाम यावर जनजागृती, तंबाखूमुक्तीची शपथ सहामाही परीक्षेतून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली, यांसह विविध उपक्रम विद्यालयात राबविण्यात आले आहेत. यशवंत विद्यालयातील कला शिक्षक महादेव खळुरे यांनी मुख्याध्यापक बालाजी बिरादार, रामलिंग तत्तापुरे, राजकुमार पाटील, कपिल बिरादार, गौरव चंवडा, सतीश बैकरे, शरद करकनाळे यांच्या सहकार्यातून शाळेने हे यश मिळविले आहे.
या यशाबद्दल डायटचे प्राचार्य अनिल, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, मुरकुटे, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, शिक्षण विस्ताराधिकारी नानासाहेब बिडवे, संस्था सचिव डी. बी. लोहारे गुरुजी, उपमुख्याध्यापक प्रेमचंद डांगे, पर्यवेक्षक रमाकांत कोंडलवाडे, उमाकांत नरडेले यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काैतुक केले आहे.