दुर्दैवी ! मिरगीच्या झटक्याने पुलावरून खाली पडला गतिमंद तरुण; काही कळायच्या आत झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 19:31 IST2022-01-17T19:30:52+5:302022-01-17T19:31:37+5:30
तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला होता

दुर्दैवी ! मिरगीच्या झटक्याने पुलावरून खाली पडला गतिमंद तरुण; काही कळायच्या आत झाला मृत्यू
पानगाव (जि.लातूर) : येथून जवळच असलेल्या तळेगाव ता. अंबाजोगाई येथील एका ३२ वर्षीय गतिमंद तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
पानगाव-बर्दापूर रस्त्यावरील रेणा नदीच्या पुलावर ही घटना घडली असून याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेणापूर पोलिसांनी सांगितले, गणेश बालासाहेब गायकवाड (३२ रा.तळेगाव) हा तरुण गतिमंद होता. त्यास फिट (फेफरे) येत होते .तो दररोज तळेगाव येथून पानगाव येथे पायी ये जा करत होता.
रविवारी तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला असता त्यास फिट(फेफरे)आल्याने तो पाण्यात पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती श्रीकांत बालासाहेब गायकवाड यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात दिली. यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ.आनंद कांबळे, नामदेव सारुळे हे करीत आहेत.