स्टेटसला ठेवले तलवारीचे छयाचित्र; तरुणाच्या हाती पडल्या बेड्या !
By राजकुमार जोंधळे | Published: February 14, 2023 06:28 PM2023-02-14T18:28:10+5:302023-02-14T18:29:17+5:30
लातुरात विवेकानंद चाैक ठाण्यात गुन्हा दाखल
लातूर : हाती तलवार घेतलेले छायाचित्र साेशल मीडियामध्ये व्हायरल करणाऱ्या तरुणाला विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून, ही घटना लातुरातील गवळीनगर येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, दहशत माजविण्याच्या, काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन काढलेले छायाचित्र साेशल मीडियात व्हायरल झाल्याची माहिती विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. या छायाचित्रावरून संबंधित तरुणाचा पाेलिसांनी शाेध सुरू केला. दरम्यान, लातूर शहरातील गवळीनगरात वास्तव्याला असलेल्या अजय राजकुमार बिराजदार (वय १८) या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात पाेलिस हवालदार खंडू शिवाजी कलकत्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. ९९ / २०२३ कलम ४ / २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवड्यामध्ये घडली दुसरी घटना...
गत आठवड्यात तलवारीने केक कापून वाढदिवस सेलिब्रेट करणाऱ्या सातपैकी पाचजणांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत, तर दाेघे पळून गेले हाेते. आता माेबाईल स्टेटसवर हातात तलवार घेतल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. दरम्यान, या छायाचित्रावरून तरुणाचा शाेध घेत त्याला पाेलिसांनी अटक केली आहे. हाती शस्त्र घेत काढलेले फाेटाे साेशल मीडियात व्हायरल करण्याच्या घटना माेठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.