पैसे दे म्हणून तरुणावर चाकूने केला हल्ला; लातुरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: September 26, 2023 07:40 PM2023-09-26T19:40:44+5:302023-09-26T19:41:56+5:30
सहा जणांविराेधात गुन्हा.
राजकुमार जाेंधळे, लातूर : तुला पानटपरी चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणून घरात घुसून एका तरुणावर चाकू, कत्ती आणि उलतन्याने हल्ला केल्याची घटना लातुरातील कव्हा नाका, माताजी मंगळवारी नगरात घडली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रवीण भिमराव ताेरकडे (वय २६) यांच्या पानटपरीवर जावून दाेन हजाराची मागणी केली. यावर पैसे नाहीत म्हटल्यावर तू पानटपरी कसा उघडताेस, ते बघाताेच? असे म्हणत ते निघून गेले. फिर्यादीने घाबरून पानटपरी बंद करुन ताे घराकडे गेला. थाेड्यावेळानंतर शक्ती गुरमे व अन्य पाच जणांनी घरात घुसून शिविगाळ करुन ‘तुला जर पानटपरी उघडायची असेल तर मला महिन्याला १५ हजार द्यावे लागतील’, असे म्हणत फिर्यादीच्या मांडीवर चाकूने हल्ला केला. शिवाय, उलट्या कत्तीने मारुन, साेन्याची अंगठी, शर्टच्या खिशातील १२ हजार ८०० रुपये काढून घेतले. त्याचबराेबर फिर्यादीच्या मित्राला लाेखंडी उलतन्याने डाेक्यात मारुन जखमी केले. उद्या जर पानटपरी उघडलीस तर खल्लास करताे, म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत गांधी चाैक ठाण्यात शक्ती गुरमे याच्यासह अन्य पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.