युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:12 AM2021-02-19T04:12:24+5:302021-02-19T04:12:24+5:30

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी सभापती मधुकरराव एकुर्केकर, उपसभापती बाळासाहेब मरल्लापल्ले, ...

Youth Congress protests against petrol, diesel and gas price hike | युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

Next

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी सभापती मधुकरराव एकुर्केकर, उपसभापती बाळासाहेब मरल्लापल्ले, शहराध्यक्ष मंजूरखाँ पठाण, अनिल मुदाळे, उदगीर विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगिरे, नाना ढगे, नरसिंह शिंदे, विनोद सुडे, आदर्श पिंपरे, यशवंत पाटील, सद्दाम बागवान, प्रीतम गोखले, रवी पाटील, प्रकाश गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपने मागील काळात इंधन भाव वाढ झाली म्हणून देशात आंदोलने केली होती. आम्ही सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल व गॅसचे भाव सर्वसामान्यांना परवडतील असे सांगून अच्छे दिन येतील, असे म्हटले होते. तसेच २ कोटी नागरिकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मात्र इंधनाच्या दरात वाढ केली. त्यामुळे महागाई वाढली आहे. मोठ्या उद्योगपतींसाठी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे, असे म्हणत केंद्र सरकारवर संताप व्यक्त करण्यात आला.

केंद्र सरकारवर संताप व्यक्त...

भाजप सरकार आल्यापासून कुणालाही अच्छे दिन दिसले नाहीत. अच्छे दिनचा काेणीही अनुभव घेतला नाही. ते अच्छे दिन भिंगाद्वारे तर दिसतील म्हणून युवक काँग्रेसने भिंगाद्वारे अच्छे दिनची शोधमोहीम हाती घेण्यात आली. गॅस, पेट्रोल दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला. येथील पेट्रोल पंपावर गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर संताप व्यक्त करण्यात आला.

Web Title: Youth Congress protests against petrol, diesel and gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.