जिल्हा परिषदेकडून आता सरपंच स्वच्छता सवांद मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:58+5:302021-09-27T04:20:58+5:30

उस्मानाबाद : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असते. हीच बाब हेरून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता ...

Zilla Parishad now launches Sarpanch cleaning campaign | जिल्हा परिषदेकडून आता सरपंच स्वच्छता सवांद मोहीम

जिल्हा परिषदेकडून आता सरपंच स्वच्छता सवांद मोहीम

Next

उस्मानाबाद : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असते. हीच बाब हेरून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ''सरपंच स्वछता सवांद'' हा उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५३ आणि दुसऱ्या टप्प्यात दोनशेवर गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील कामे सुरु झाली आहेत. मात्र, ही कामे केवळ गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांच्या माध्यमातून मुदतीत पूर्ण होणार नाहीत. यासाठी गावच्या सरपंचांचीही तितकीच खंबीर साथ लाभणे गरजेचे असल्याचे समोर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ''सरपंच स्वच्छता सवांद'' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ते ऑनलाईन सवांद साधत आहेत. याचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत. थेट सीईओ आपल्याशी सवांद साधत आहेत, म्हटल्यावर सरपंच मंडळी आता पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने कार्यरत झाली आहेत. त्यामुळे मंजूर कामाची गतीही वाढली आहे.

कोट...

कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घरातील वैयक्तिक शौचालय सुविधेचा नियमित वापर केला पाहीजे. जे नागरिक उघड्यावर शौचास जातात, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गावात गुडमाॅर्निंग पथके कार्यान्वित करावीत.

जिल्ह्यात २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे होणेसाठी कुटुंबस्तर व सार्वजनिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात असून, शोषखड्ड्यांची निर्मिती करताना गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून शोषखड्डे दूर अंतरावर असावेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होणार नाहीत, याची सरपंच व ग्रामसेवकांनी दक्षता घ्यावी.

-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.

यात जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे.

कोट...

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ''स्वच्छता ही सेवा'' अभियानात गावात सार्वजनिक ठिकाणच्या परिसराची स्वच्छता, प्लास्टिक कचरा संकलन, सिंगल युझ प्लास्टिक वापर बंदी ठराव घ्यावेत.

-अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: Zilla Parishad now launches Sarpanch cleaning campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.