बालामुळे जिल्हा परिषद शाळा, पालकांचे नाते अधिक घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:45+5:302021-08-01T04:19:45+5:30

डिगोळ : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ही गावातील प्रत्येक पाल्याच्या पालकांना आपलीशी वाटावी म्हणून बाला उपक्रम हाती घेतला ...

Zilla Parishad schools, parents' relationship is stronger due to child | बालामुळे जिल्हा परिषद शाळा, पालकांचे नाते अधिक घट्ट

बालामुळे जिल्हा परिषद शाळा, पालकांचे नाते अधिक घट्ट

Next

डिगोळ : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ही गावातील प्रत्येक पाल्याच्या पालकांना आपलीशी वाटावी म्हणून बाला उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे पालक आणि शाळांचे नाते अधिक घट्ट होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

डिगोळ येथील जिल्हा परिषद शाळेत बाला उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, गटविकास अधिकारी नंदकुमार शेरखाने, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, दिनकर व्होटे, एरंडे, सरपंच कविता दासरे, उपसरपंच बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक विद्यासागर कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी लोकसहभागातून १ लाख ८० हजार रुपये खर्चून शाळेतील वर्गखोल्यांची केलेली रंगरंगोटी, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी खेळाचे उपक्रम, सुरु करण्यात आलेली परसबाग याची पाहणी केली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी पागे यांनी केले.

Web Title: Zilla Parishad schools, parents' relationship is stronger due to child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.