Diwali 2020 : दिवाळीची साफसफाई करताना 'या' टिप्स वापराल; तर कमी वेळात घर होईल चकाचक!
By Manali.bagul | Published: November 8, 2020 06:05 PM2020-11-08T18:05:35+5:302020-11-08T18:08:37+5:30
Diwali 2020 cleaning tips: तुम्हाला जास्त काम करून दमल्यासारखं होत असेल किंवा इतर कामांमुळे साफ सफाईकडे दुर्लक्ष होत असेल तर आज आम्ही तुम्हाला साफसफाईसाठी आवश्यक असलेल्या काही टिप्स सांगणार आहोत.
दिवाळीचा सण एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे बाहेर, नातेवाईकांकडे येणं जाणं नसलं तरी घरच्याघरी मात्र सगळेजण आनंदाने दिवाळी साजरी करतील. दिवाळी म्हटलं की घराघरातील गृहिणींना आवराआवर आणि साफ सफाईचं टेंशन येतं. पण काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला जास्त काम करून दमल्यासारखं होत असेल किंवा इतर कामांमुळे साफ सफाईकडे दुर्लक्ष होत असेल तर आज आम्ही तुम्हाला साफसफाईसाठी आवश्यक असलेल्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आपलं घर चकचकीत शकता.
सगळे घर एकत्र स्वच्छ करायचं ठरवलं, तर तुमचा वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाया जाईल. तुमचे काम आणि प्रयत्न यांचा प्राधान्यक्रम ठरवा. तुमचा वेळ आधी लादी, भांडी यांच्या साफसफाईत वाटून घ्या. तांबा, पितळाची भांडी घासायला खूप वेळ लागतो. कारण काळपटपणा निघता निघत नाही. त्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा किंवा चणाडाळीचा वापर करून तांबा आणि पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. त्यामुळे कमी वेळात भांडी स्वच्छ होण्यास मदत होईल.
घराची साफसफाईची करताना पंख्यांची साफसफाई करणं कठीण होतं. पंख्याची साफसफाई करताना तुम्ही जुन्या उशीच्या कव्हरचा वापर करू शकता. सुर्चीवर उभं राहून दाबून पंख्यांच्या पात्यावरील धूळ काढून घ्या. विशेष म्हणजे खर्चीवर चढून पंखा साफ करताना घरातील कोणालाही खुर्ची पकडायला सांगा किंवा लक्ष ठेवण्यास सांगा. कारण अनेकदा साफसफाईत लक्ष असेल तर तोल जाऊन पडण्याची शक्यता असते म्हणून आधीच सावधगिरी बाळगा.
बाथरूममध्ये टाईल्सची साफसफाई करणे सोपे आहे, पण भिंतीवरील डाग काढणं कठीण आहे. त्यासाठी आपण बेकिंग सोड्याच्या साहाय्याने टाईल्स स्वच्छ करू शकता. गरम पाणी किंवा कोलगेटचा वापर करून ब्रशने तुम्ही टाईल्स स्वच्छ केल्या लवकरात लवकर स्वच्छ होतील. पैशांच्या बाबतीत 'या' गोष्टी लक्षात ठेवाल; तर कठीण प्रसंगात नक्की होईल फायदा
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाका. नको असलेल्या वस्तू देऊन टाका आणि घरातला पसारा आवरा. नव्या उत्पादनांच्या मदतीने नेहमीच्या फडक्याला किंवा मॉपला सुट्टी देता येईल. स्प्रे मॉपचा वापर करून लादी चकचकीत स्वच्छ करता येईल. नव्या प्रकारचे स्प्रे मॉप्स हातात सहज धरता येण्यासारखे असल्यामुळे वाकून पूसण्याची काही गरज नाही. 'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा