Gudhipadwa : आरती गुढीची... वाचून बघा, मन प्रसन्न होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 01:49 PM2018-03-13T13:49:05+5:302018-03-16T17:20:05+5:30

गुढीचं पूजन केल्यानंतर वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. यंदा गुढीपूजनावेळी गुढीची आरती म्हणून प्रसन्नतेचा अनुभव घेता येईल. 

Gudhipadwa: Read the book of Arti Gudi ..., the mind will be pleased! | Gudhipadwa : आरती गुढीची... वाचून बघा, मन प्रसन्न होईल!

Gudhipadwa : आरती गुढीची... वाचून बघा, मन प्रसन्न होईल!

Next

मुंबईः दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी नववर्षदिनी अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सगळे नव्याा संकल्पांची गुढी उभारणार आहोत. या गुढीचं पूजन केल्यानंतर वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. यंदा गुढीपूजनावेळी गुढीची आरती म्हणून प्रसन्नतेचा अनुभव घेता येईल. 

आरती गुढीची

गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती

विश्वनिर्मिती ब्रह्मा करितो ब्रह्मपुराणि असे
अयोध्येसी वनवासाहुनि राम पुन्हा परतसे

गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करिती
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती

माधव तसे मधुमास ही वेदातील नावे
पंचांगाचे पूजन सर्वहि करिती मनोभावे

सरस्वतीस गंध आणिक पाटीही पुजिती
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती

साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा
गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकु केशर टिळा

आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोधिती
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती

पिशाच्च जाई दूर पळोनि कडुलिंबाचा टाळा
कडू रसाचे सेवन करू या गूळ जिरे घाला

स्मिता सांगे सण हा पहिला वर्षाचा करिती
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती

गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णु किती

सौजन्यः सोशल मीडिया

Web Title: Gudhipadwa: Read the book of Arti Gudi ..., the mind will be pleased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.