राजस्थानच्या 'या' गावची सून होणार ईशा अंबानी, 'हा' आहे सासरचा पिढीजात वाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 05:41 PM2018-05-07T17:41:52+5:302018-05-07T17:41:52+5:30
आनंद पीरामल हे मुळचे राजस्थानच्या झुंझुनूमधील बगडचे रहिवाशी आहेत.
मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा विवाह आनंद पीरामल यांच्याशी होणार आहे. आनंद पीरामल हे पीरामल ग्रुपचे संस्थापक सेठ पीरामल यांची नातू व अजय पीरामल यांचे पूत्र आहेत. आनंद पीरामल हे मुळचे राजस्थानच्या झुंझुनूमधील बगडचे रहिवाशी आहेत. ईशा आता या मोठ्या घराण्याची सून होणार आहे. बगडमध्ये असणारे वाडे सगळीकडेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लग्नानंतर ईशा त्यांच्या बगडमधील वाड्याला नक्कीच भेट देईल.
बगडमध्ये आजही पीरामल ग्रुपचा पिढीजात वाडा आहे. तेथिल वाडे खूप प्रसिद्ध आहेत. पण त्या गावात असणारा पीरामल यांच्या वाड्याचा थाट फार वेगळा आहे. वाड्याच्या आतमध्ये अतिशय भव्य वास्तूकला आहे. या वाड्याला आता हॉटेलचं रुप देण्यात आलं असून पर्यटक तेथे राहतात.
राजस्थानमध्ये अनेक मोठ्या व्यावसायिकांचे व सावकारांचे वाडे आहेत. तेथिल वाडे वास्तू व कलेच्या दृष्टीने विविध व भव्य आहेत. वास्तू कलेचं उत्तम उदाहरण देणारे भव्य वाडे आहेत.