शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 04:23 PM2017-11-27T16:23:52+5:302017-11-27T16:41:58+5:30

या फोटोत जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर भूतदया भाव दिसून येतोय.

Photo viral Posted by Chef Vikas Khanna woman breastfeeding deer | शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य

शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य

googlenewsNext
ठळक मुद्देशेफ विकास खन्ना यांनी असाच एक फोटो शेअर करत मानवतेचं वेगळं रुप नेटिझन्सना दाखवून दिलं आहे.शेफ विकास खन्ना यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. आई आपल्या लेकरांवर मनापासून प्रेम करते. आपल्या लेकरांसाठी आई काहीही करू शकते.

जोधपूर - मानवतेचं सगळ्यात भव्य रुप माहितेय का तुम्हाला? मानवतेचं सगळ्यात मोठं रुप आहे दया. शेफ विकास खन्ना यांनी असाच एक फोटो शेअर करत मानवतेचं वेगळं रुप नेटिझन्सना दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. शेफ विकास खन्ना यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोत एक महिला हरणीच्या पिल्लाला स्वत:चं दूध पाजताना दिसत आहे. बिश्नोई समाजातील महिला या फोटोत दिसतेय. हा फोटो शेअर करताना विकासने सांगितलं आहे की या महिलेने अनेक हरणांच्या पिल्लांना जीवनदान दिलंय. असं म्हटलं जातं की, बिश्नोई समाजातील महिला प्राण्यांना नुसतं पाळत नाहीत तर त्यांना त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळतात. एवढंच नाहीतर या समाजातील पुरुषही बेवारस हरणांना पकडून आपल्या घरी पाळतात. 

विकास खन्ना यांनी हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, मानवतेचं सगळ्यात मोठं रुप दया आहे. या महिलेने मला सांगितलं की तिने अनेक अनाथ आणि जखमी हरणांच्या पिल्लांना स्वत:चं दूध पाजून जीवनदान दिलं आहे. हा फोटो राजस्थानच्या जोधपूर येथे क्लिक केलेला आहे.’ आई आपल्या लेकरांवर मनापासून प्रेम करते. आपल्या लेकरांसाठी आई काहीही करू शकते. पण प्राण्यांना आपलं दूध पाजणारी आई तुम्ही कधीच पाहिली नसेल. पण राजस्थानमधील बिश्नोई समाजातील अनेक महिला प्राण्यांवर आपल्या लेकरांप्रमाणेच जीव लावतात. 

आणखी वाचा - शेफ होण्याचं स्वप्न पाहणारा एक दोस्त

बिश्नोई समाजाचं नाव भगवान विष्णूच्या नावाने पडलं आहे. हा समाज पर्यावरणाची पूजा करतो. राजस्थानच्या वाळवंटामध्ये या समाजातील लोक आढळतात. जंगलात राहणारा हा समाज हिंदू गुरू श्री जम्भेश्वर भगवानला मानतात. काही वर्षांपूर्वी झाडांचं संरक्षण व्हावं याकरता 'चिपको आंदोनल' करण्यात आलं होतं. त्यामध्ये या समाजाची अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. एकंदरीत काय तर, पर्यावरणाला जपणारा, त्यांची निगा राखाणार, पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाचा मान राखणारा समाज सध्या अंधारात असला तरीही त्यांच्यामुळेच पर्यावरणाचं संवर्धन होत आहे.

सौजन्य - www.timesnownews.com

Web Title: Photo viral Posted by Chef Vikas Khanna woman breastfeeding deer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.