रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या आणखी ५०० जनुकांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:10 PM2018-09-27T17:10:25+5:302018-09-27T17:11:31+5:30

या अभ्यासात संशोधकांनी १० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर  एपीओइ सारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृद्यरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे.

Research finds 500 more genes that affect blood pressure | रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या आणखी ५०० जनुकांचा शोध

रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या आणखी ५०० जनुकांचा शोध

googlenewsNext

लंडन- ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या एका मोठा जनुक अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. या संशोधकांनी रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या ५०० जनुकांचा शोध लागल्याचा दावा केला आहे.  या संशोधनामध्ये १० लाख लोकांच समावेश करण्यात आला होता. रक्तदाब आणि जनुकीय संबंध या विषयावर क्वीन मेरी युनिव्हर्सिटी आॅफ लंडन अँड इम्पेरियल कॉलेज आॅफ लंडनच्या संशोधकांनी अभ्यास केला.

रक्तदाब आणि जनुके यांच्यसंबंधातील ही सर्वात मोठी प्रगती असल्याचे मत नॅशनल रिसर्च बार्ट्स बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक मार्क कॉलफिल्ड यांनी सांगितले. रक्तदाबावर परिणाम करणारे १००० जनुकीय संकेत आता आपल्याला माहिती झाले आहेत. यामुळे आपले शरीर रक्तदाब कसे नियंत्रित करते आणि भविष्यात औषधनिर्मिती कशी करावी लागेल याची माहिती या शोधामुळे मिळेल असे मार्क यांनी मत व्यक्त केले. 

जुनकांमुळेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांना डॉक्टर आता जीवनशैलीतील बदल, वजन कमी करणे, मद्यपान कमी करणे, व्यायाम करणे असे उपाय सुचवू शकतील. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृद्यरोगाच त्रास होण्याची भीती असते, त्यामुळे केवळ २०१५ या एका वर्षामध्ये जगभरात ८० लाख लोकांचे प्राण गेले अशीही माहिती त्यांनी दिली.

या अभ्यासात संशोधकांनी १० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर  एपीओइ सारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृद्यरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे. तसेच काही जनुके अ‍ॅड्रिनल ग्रंथी व मेदपेशींशी संबंधित असल्याचेही संशोधकांना यामध्ये दिसले. या जनुकीय संकेतांना ओळखता आल्यामुळे आजाराच्या गांभीर्यानुसार रुग्णांचे गट करता येतील असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि इम्पेरियल कॉलेज, लंडन येथिल अध्यापिका पॉल इलियट यांनी सांगितले. या अभ्यासामुळे रक्तदाबावर उपचार करण्यासाठी नव्या पद्धतींचा शओधही लागण्याची शक्यता आहे. नेचर जेनेटिक्स या नियतकालिकामध्ये या संशोधनावर आधारीत निबंध प्रसिद्ध झाला आहे.

Web Title: Research finds 500 more genes that affect blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य