कोपरा न कोपरा खुलविणारे साइड टेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:11 AM2018-12-08T00:11:35+5:302018-12-08T00:11:43+5:30
या जागेचाही योग्य तो उपयोग करता येईल, म्हणजे या कोप-यांमध्ये साइड टेबल ठेवून आवश्यक ते सामान ठेवता येईल.
- रीना चव्हाण
प्रत्येकाच्या घरात गरजेनुसार फर्निचर असते; पण बऱ्याचदा घरातील कोपरे तसेच राहतात. या जागेचाही योग्य तो उपयोग करता येईल, म्हणजे या कोप-यांमध्ये साइड टेबल ठेवून आवश्यक ते सामान ठेवता येईल. विविध आकारातील साइड टेबल मार्केटमध्ये सहज उपलब्ध असून आपल्या आवडीनुसार व जागेच्या अंदाजानुसार त्याचा वापर करता येईल. हॉल, किचन, बेडरूम, स्टडीरूम मध्येही आपल्या गरजेनुसार आपण हे टेबल ठेवू शकतो. चौकोनी टेबल एखाद्या बॉक्ससारखे असतात, त्यामध्ये आपल्या गरजेनुसार खणही करू शकता. जेणेकरून या टेबलावर फ्लॉवरपॉट, टेबल लॅम्प, घड्याळ ठेवू शकता आणि आतमध्ये पुस्तके, गरजेच्या छोट्या-छोट्या वस्तू ठेवता येतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टेबलावर काचही लावून घेऊ शकता. ट्रेच्या आकारात असलेला हा टेबल आपल्या गरजेनुसार बंद व उघडता येत असल्याने जास्त जागाही लागत नाही. दिसण्यासही आकर्षक असतात. पुस्तक ठेवण्याबरोबर चहा नाश्ता करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. गोल टेबलही इतर टेबलांसारखे दिसायला छान दिसतात. लाकडापासून बनविलेले गोल टेबल सर्रास बघायला मिळतात; पण आता प्लॅस्टिक, मेटलमध्येही ते सहज मिळतात. स्तंभाकार टेबलही चांगला पर्याय आहे. एकाच टेकूवरील हा टेबल दिसायलही छान दिसतो. हॉल नाहीतर बेडरूममध्ये तुम्ही यावर फोटोफ्रेम, टेलिफोन नाहीतर लॅम्पही ठेवू शकता. विशेषत: हॉलमध्ये एका कोपºयात या टेबलवर लॅम्प, फुलदानी नाहीतर टेबल कॅलेंडरही ठेवू शकता.
>पा रंपरिक गोल, चौकोनी, आयाताकाराबरोबर आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार साइड टेबलमध्येही वेगळेपण दिसून येते. लाकडाबरोबर स्टील, लोखंडी, वेत, प्लावूड, काच अशा विविध प्रकारची आकर्षक साइड टेबल मार्केटमध्ये सहज मिळतात. काहींवर तर कोरीवर नक्षीकामसुद्धा केलेले असते. शेवटी प्रत्येकाच्या आवडीनुसार फर्निचरची जशी निवड केली जाते तशीच टेबलचीसुद्धा केली जाते. एवढेच नव्हे तर ते एकप्रकारे आपल्या फर्निचर मांडणीला पूर्णत्व देतात. साधारणत: वापरण्यात येणाºया साइड टेबल बाबत जाणून घेऊ या.