उन्हाळ्यात फिरायला जाण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 05:48 PM2018-03-29T17:48:13+5:302018-03-29T17:48:13+5:30

फिरायला जाण्याआधी काही गोष्टींची खास काळजी घेतली तर तुम्हाला तुमच्या सुट्टीचा पूर्ण आनंद घेता येईल.

Take care of these things before going for a summer walk, otherwise it will fall! | उन्हाळ्यात फिरायला जाण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पडेल महागात!

उन्हाळ्यात फिरायला जाण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पडेल महागात!

Next

उन्हाळ्यात फिरायला जायचं म्हणजे उन्हाचे चटके, पाण्याची कमतरता आणि खूप सारा थकवा हे आलंच. यामुळे तुमचा सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लॅन धुळीला मिळू शकतो. काही मोजकी ठिकाणं सोडली तर सगळीकडेच गरमीमुळे अंगाची लाही-लाही होते. त्यामुळे फिरायला जाण्याआधी काही गोष्टींची खास काळजी घेतली तर तुम्हाला तुमच्या सुट्टीचा पूर्ण आनंद घेता येईल.

1) योग्य कपड्यांची निवड

उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर योग्य कपड्यांची निवड फार महत्वाची ठरते. अशावेळी तुम्हाला केवळ फॅशनचा विचार करुन चालत नाही. या दिवसात तुम्ही उन्हात फिरणार त्यामुळे वरुन तडपता सुर्य तुम्हाला चिंब भिजवणार. त्यामुळे टाईट कपडे न वापरता सैल कपडे वापरलेले कधीही फायद्याचे ठरेल. 

2) भरपूर पाणी

गरमीच्या दिवसात फिरायला जाणार असाल तर जास्तीत जास्त पाणी पिणे फार गरजेचे आहे. त्यामुळे सोबत पाणी आणि ग्लूकोज सतत ठेवावं. जर तुम्ही डोंगराळ भागात फिरायला जाणार असाल आणि अशात तुम्हाला उलटी झाल्यास पाणी पिणे कमी करा. 

3) सन्सक्रीम सोबत ठेवा

असं अजिबात नाहीये कि, त्वचेची काळजी केवळ मुलींनीच घ्यावी. उन्हाळ्यात प्रवास करताना त्वचेची काळजी घेणं सर्वात गरजेचं आहे. अशावेळी बॅगमध्ये सन्सक्रीम नक्की ठेवा. वेळोवेळी शरीरावर लावत रहा. 

4) चष्मा - टोपी - पांढरा स्कार्फ

या दिवसात बाहेर पडताना सनग्लास, टोपी किंवा पांढरा स्कार्फ सोबत ठेवा. कारण उन्हामुळे तुमच्या डोळ्याना त्रास होऊ शकतो. तसेच डोक्यावर काही नसल्यास उष्माघाताचीही शक्यता अधिक असते.

5) रोडवरचं खाणं टाळा

उन्हाळ्यात बाहेर पडल्यावर स्ट्रीट फूड खाणे टाळा. या दिवसात जराही चुकीचं काही खाल्ल तर डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

6) कोणत्या रंगांचे कपडे

उन्हाळ्यात सैल कपडे वापरण्यासोबतच कपड्यांचा रंगही तितकाच महत्वाचा आहे. या दिवसात खासकरुन भडक रंगांचे कपडे वापरणे टाळावे. या दिवसात शक्यतो पांढ-या रंगांचे कपडे वापरावे.   

Web Title: Take care of these things before going for a summer walk, otherwise it will fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.