रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 07:33 PM2018-01-19T19:33:25+5:302018-01-19T19:39:55+5:30

आयुष्यात असलेल्या अनेक लहान सहान गोष्टी आपल्या भोवताली नकारात्मकता आणत असतात आणि आपल्याला यशापासून दूर ठेवतात.

these things will give possitive energy to your life | रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी

रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधीही अनेक संकल्प आपण नववर्षाला केले असतील. पण खरंच हे संकल्प पूर्ण होतात का? आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त जर तुम्ही संकल्प केलात तर ते पूर्ण कसे होणार?आपल्यातील नकारात्मकता झटकून नव्याने काम करायला सुरुवात केली कि आयुष्यातील अनेक गोष्टी बदलु शकतात.

मुंबई : जिम जॉईन करण्यापासून ते अनेक पुस्तकं वाचेपर्यंत असे अनेक संकल्प आपण नववर्षाला केले असतील. पण खरंच हे संकल्प पूर्ण होतात का? आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त जर तुम्ही संकल्प केलात तर ते पूर्ण कसे होणार? त्यापेक्षा तुमच्या नेहमीच्या दिनचर्येप्रमाणेच जर तुम्ही तुमचे संकल्प आखलेत तर ते नक्कीच पूर्ण होतील. नवीन वर्षाची सुरुवात होऊन एक महिना संपत आला. आपल्यातील नकारात्मकता झटकून नव्याने काम करायला सुरुवात केली कि आयुष्यातील अनेक गोष्टी बदलु शकतात. आपल्यातली सकारात्मकता वाढवण्याची ताकद आपल्यातच असते. फक्त त्याला थोडीशी संयम आणि नियमांची गरज आहे. आजपासून असे थोडेसे हटके संकल्प करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सकरात्मक बदल निश्चित झालेला असेल. 

एक स्माईल तो बनती है!

इमारतीच्या लिफ्टमधून बाहेर पडल्यावर लिफ्टमनला एखादं छानसं स्माईल करून त्यांना थँक्स म्हणालात तर त्यांचाही दिवस आनंदात जाईल. ही सवय तुम्ही रोज लावून घेतली तर तुमच्याही आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. लहान लहान गोष्टींसाठी थँक्स म्हणणं आणि प्रत्येक चुकीला सॉरी म्हणणं ही चांगल्या व्यक्तीची लक्षणं आहेत. 

जिवंत कलाकृती अनुभवा

मनोरंजनाचं सगळ्यात उत्तम माध्यम म्हणजे नाटक. नाटकांमधून जी जिवंत कलाकृती अनुभवयाला मिळते ती कोणत्याच माध्यमातून मिळत नाही. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा असं वाटत असेल तर महिन्यातून निदान एक तरी नाटक किंवा तत्सम प्रकारची कलाकृती पाहाच.

निसर्गप्रेमी व्हा

या वर्षात एखादं बी पेरून त्याचं रोपटं होताना पाहा. या रोपट्याला नियमित पाणी घाला. काही वर्षांनी हेच रोपटं जेव्हा वृक्ष बनेल तेव्हा तुम्हाला या वर्षाची आठवण करून देईल. हा संकल्प खरंतर प्रत्येक वर्षी करायला हवा. वर्षभरात प्रत्येकाने निदान एकतरी रोपटं पेरलं पाहिजे. तरच येणारं भवितव्य सुजलाम सुफलाम असेल.

थेंबे थेंबे तळे साचे

नव्या वर्षात केवळ पैशांचीच सेव्हिंग केली पाहिजे असं नाही. आपण ज्या गोष्टी नियमित वापरतो त्यातही थोडी-फार सेव्हिंग करायला शिकलं पाहिजे. अगदी रोज जर तुम्हाला चहामध्ये दोन चमचे चहापावडर लागत असेल तर आठवड्यातून दीड चमचा पावडर घ्या. या छोट्या छोट्या बचतीतून आपण बरंच काही कमवू शकतो. 

स्वतःशीच स्पर्धा असु द्या

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता? आजपासून एक गोष्ट नक्की करा. दिवसाची सुरुवात करताना एखादं उद्दिष्ट्यं डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दर दिवशी ठरवलेलं उद्दीष्ट्य हे गेल्या दिवशीच्या उद्दिष्टापेक्षा थोडंसं वरचढ ठेवा. म्हणजेच इतरांशी स्पर्धा लावण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करा. आपण ठरवलेले सगळे टार्गेट पूर्ण करा. एखादे वेळी उद्दिष्ट पूर्ण नाही झालं तरी दुःखी होण्याचं कारण नाही. कारण हा संकल्प केवळ आपल्यापूरता आणि आपल्या कामापूरता असतो. 

Web Title: these things will give possitive energy to your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.